

Jalna News
esakal
जालना: जिल्ह्यात जालना आणि भोकरदन येथे नव्याने होणाऱ्या दोन अपर तहसील निर्मितीच्या हालचालींना आता वेग आला आहे. दरम्यान, या तहसीलमुळे नागरिकांची जमीन, महसूल आणि प्रशासकीय कामे जलद गतीने होण्यास मदत होणार असून कामाच्या विभागणीमुळे मुख्य तहसीलवरील काम कमी होऊन प्रशासकीय कामात सुलभता येणार आहे. तसेच ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांचा वेळ वाचणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.