Kannad Crime : विवाहितेने गळफास लावून संपविले जीवन; हुंड्यासाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल

१२ लाख रुपयांच्या हुंड्याच्या मागणीला आणि मानसिक-शारीरिक त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने गळफास लावून जीवनयात्रा संपविली.
Crime

Crime

sakal

Updated on

​कन्नड - नवीन घर बांधण्यासाठी आणि विविध कारणांसाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या १२ लाख रुपयांच्या हुंड्याच्या मागणीला आणि मानसिक-शारीरिक त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध शुक्रवारी (ता.१२) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुजा उत्कर्ष गोटे (वय-२४, मूळ रा. शिरेगाव, ता. गंगापूर, ह.मु. हतनुर, ता. कन्नड) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com