Mayuri Khare
sakal
कन्नड - तालुक्यातील भोकनगाव येथील मयुरी सचिन खरे (वय २३) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी आता एक मोठे वळण आले आहे. या घटनेनंतर सुरुवातीला केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत मयुरीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर, अखेर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि सासऱ्यावर हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.