MLA Prashant bamb
sakal
- रामेश्वर अमृते
गंगापूर - गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांचे दुसरे व तिसरे हप्ते प्रलंबित असल्याने बांधकामे रखडली आहेत. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार प्रशांत बंब यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी केली आहे.