

बीड : शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी सोमवारी (ता. १७) संस्थाचालक पिता-पुत्रावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रम बाबूराव मुंडे आणि अतुल विक्रम मुंडे (दोघेही रा. देवगाव, ता. केज) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.