

Preparations Underway for Renuka Devi Navratri Festival at Mahur Temple
esakal
माहूर: देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकादेवीच्या नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरवात होत असून, प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवारी (ता. सहा) येथे पूर्वतयारी आढावा बैठक घेऊन विविध सूचना केल्या. दरम्यान, नवरात्रोवात मंदिर पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.