दुकानाला आग; सात लाखांचे नुकसान, जिंतूर येथील दुर्घटना

बाजारपेठेतील व्यापारी सय्यद रसूल ( दादू ) सय्यद इसाक यांच्या टीनपत्र्याच्या दुकानात ग्राहक सेवा केंद्र व एस. डी. युनानी औषधी दुकान आहे.
जिंतूरमध्ये दुकानाला आग
जिंतूरमध्ये दुकानाला आग
Updated on

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : शहरातील उस्मानपुरा बाजारपेठेतील एका ग्राहक सेवा केंद्र व युनानी औषध दुकानाला बुधवारी (ता. दोन) मध्यरात्री शाॅर्टसर्किटने लागलेल्या आगीत रोख रक्कमेसह सात लाखाचे नुकसान झाल्याचे गुरुवारी (ता. तीन) सकाळी उघडकीस आले.

बाजारपेठेतील व्यापारी सय्यद रसूल ( दादू ) सय्यद इसाक यांच्या टीनपत्र्याच्या दुकानात ग्राहक सेवा केंद्र व एस. डी. युनानी औषधी दुकान आहे. बुधवारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे आगमन झाले होते. त्यात रात्री दोनच्या सुमारास या दुकानातून धुर निघत असल्याचे शेजारच्या नागरिकांना दिसून आले. त्यांनी तत्काळ दुकादार स. रसूल यांना फोनवर माहिती देताच त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. तोपर्यंत दुकानाला आगीने घेरले होते.

हेही वाचा - प्रिन्स मोहम्मद-बिन-सलमान यांनी उदारमतवादी धोरणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

सय्यद रसुल यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या अग्निशामक दलास फोन केला. पण फोन लागत नसल्याने काही नागरिकांनी अग्निशामक कार्यालयात जाऊन घटनेची माहिती सांगितली. तरीही एका तासानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत अगीत दुकान जाळून खाक झाले होते. या आगीत दुकानातील युनानीचे नामांकित कंपनीची औषधी, ग्राहक सेवा केंद्रातील संगणक, कलर प्रिंटर, झेरॉक्स मशीन, लॅमिनेशन मशिन व गल्ल्यातील रोख पन्नास हजार रुपये असे सात लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

येथे क्लिक करा - शिवसेनेची आरक्षणाबाबत भूमिका काय आहे, हे मला जास्त माहिती आहे. शिवसेनेने कधीही आरक्षणाला पाठिंबा दिला नव्हता.

पोलिस बिट हवालदार सुलोचना गाडेकर यांनी गुरुवारी घटनास्थळाचा पंचनामा करुन घटनेची नोंद केली. सध्या सततच्या लाॅकडाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या दुकानदारांवर पुन्हा आर्थिक फटका बसल्याने शासनाने आर्थिक मदत करावी म्हणून मागणी होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com