ST Bus Accident
sakal
- मोहन रोटे
धाकलगाव - जालना–वडिगोद्री महामार्गावरील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजता अंबड आगाराच्या दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार २५ ते ३० प्रवासी जखमी झाले असून, त्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.