tembhapuri-project-power-supply
sakal
शेंदुरवादा - गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा परिसराला वरदान ठरलेल्या टेंभापुरी मध्यम प्रकल्पात यंदा अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभाग आणि महावितरणच्या संयुक्त मोहिमेतून शेतीपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या ३२ विद्युत रोहित्रांचा (डीपी) वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.