

औसा : औसा शहरातील ताले बुऱ्हाण भागात खेळता खेळता विहिरीत पडून सख्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१०) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अलिना समीर शेख (वय ६) वर्ष व उस्मान समीर शेख (वय तीन) वर्ष असे मृत चिमुकल्यांची नावे आहेत.