katepimpalgaon shingi road work start
sakal
- रामेश्वर अमृते
गंगापूर - तालुक्यातील काटेपिंपळगाव, झोडेगाव आणि शिंगी या गावांना जोडणाऱ्या राज्य मार्ग ६५ (प्रजिमा २७) या रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारी आणि गंगापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिलेल्या इशाऱ्याची बातमी दैनिक सकाळने प्रसारित केली होती .यानंतर प्रशासनाने हालचाली करत काम सुरू केले.