

Kalika Mata Tradition In Yerrol Villagers Take Traditional Journey To Bring Goddess Back After Four Months Without Rain
sakal
येरोळ : यंदाच्या पावसाळ्यात चार महिने येरोळ शिवारात पाऊस न पडल्याने ग्रामदैवत कालिकादेवी माता गावावर रुसून माहेरी गेली, अशी श्रद्धा ग्रामस्थांमध्ये आहे. माता बेटावरील बालीपीर दर्गा येथे भावाकडे गेल्याचे स्वप्न गावातील एका व्यक्तीला पडल्याची चर्चा गावात झाली. त्यानंतर रुसलेल्या ग्रामदेवतेला गावातील मंदिरात आणण्यासाठी ग्रामस्थांनी रविवारी (ता. चार) पारंपरिक पद्धतीने यात्रा काढली होती.