Anil deshmukh
Anil deshmukhesakal

अनिल देशमुख तुरुंगातच; न्यायालयाने पुन्हा फेटाळला जामीन

मुंबईतील विशेष न्यायालयाने आज हा निकाल दिला.
Published on

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन मुंबईतील (Mumbai) विशेष न्यायालयने फेटाळला. न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी हा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail) न्यायालयीन कोठडीत आहेत.

Anil deshmukh
खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे अशी अर्थसंकल्पाची अवस्था - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामिन अर्ज कोर्टाने नाकारला. मुंबई सत्र न्यायालयाला विशेष पीएमएलए कोर्टाने हे महत्वाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांना दिलासा मिळालेला नाही. तब्बल 100 कोटी रुपये वसुलीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना तुरुंगाबाहेर येण्यासाठी अद्यापही जामीन मिळालेला नाही.

Anil deshmukh
तुमच्या गिधाड धमकीला आम्ही घाबरत नाही, सभागृहात शेलार संतापले

दरम्यान, ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

Anil deshmukh
विरोधी पक्षनेत्यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही : गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com