Mansi Khambe
नमस्कार, मी मानसी वर्षा विजय खांबे.
मी ई-सकाळमध्ये मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून काम करते. मला मनोरंजन, सामाजिक यासह राजकारण विषयावरील बातम्या लिहण्याची आवड आहे. मला डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात कामाचा १ वर्षाचा अनुभव आहे.
मी साऊथ इंडियन वेलफेअर सोसायटी कॉलेज (एसआयडब्ल्यूएस), वडाळा येथून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. डिसेंबर २०२३ मध्ये प्रहार मध्ये प्रिंट विभागात इंटर्न म्हणून काम केले. त्यानंतर प्रहारच्या वेब विभागात १ वर्ष कार्यरत होते. यावेळी मला अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा अनुभव घेता आला.
याशिवाय मला नाटक, सिनेमा आणि वेबसिरीज बघायला आवडतं. तसेच वाचन करणे, विविध विषयांवर लिहणे, चित्रकारिता करणे हा माझा आवडता छंद आहे.