

Soil dumped into Ulhas River for Chhath Puja
ESakal
बदलापूर : शहराची जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदीपात्रात छटपूजेच्या तयारीसाठी मातीचा भराव टाकण्याचे काम कुळगाव-बदलापूर नगरपालिकेमार्फत सुरू असल्याचे महसूल विभागाच्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. याप्रकरणी अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांत खुलासा मागवला आहे. उल्हास नदी बचाव समितीनेही या भरावाबाबत आक्षेप घेतल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.