Baramati Vidhansabha Byelection : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न; दिल्ली दरबारी होणार काँग्रेसचा निर्णय

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजूनही प्रयत्न सुरूच.
Congress Party

Congress Party

sakal

Updated on

मुंबई - अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजूनही प्रयत्न सुरूच आहेत. आज ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट घेऊन चर्चा केली. त्याचबरोबर काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी या नेत्यांचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांशी संपर्क करण्याचे प्रयत्न ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांकडून सुरू आहेत. मात्र याबाबत अंतिम निर्णय काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेते घेणार असल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com