उरणकरांना दिलासा! जुना खोपटा पूल वाहतुकीसाठी खुला होणार, तारीख आली समोर

Uran Traffic: उरणमधील जुना खोपटा पूल १० नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या निर्णयामुळे उरण परिसरातील वाहनचालक आणि प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Uran Traffic

Uran Traffic

ESakal

Updated on: 

उरण : तालुक्याचा महत्त्वाच्या जुन्या खोपटा पुलाच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी १० नोव्हेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोंडीचा तीव्र त्रास सहन करणाऱ्या उरणकरांसाठी ही बातमी दिलासादायक ठरली आहे. १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या संकल्पनेतून बांधलेला हा पूल उरणच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com