महापौर किशोरी पेडणेकर डेअर डेव्हील - मनीषा कायंदे

महापौर किशोरी पेडणेकरांना आलेल्या धमकीच्या पत्रावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
kishori pednekar
kishori pednekarTeam eSakal

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आल्याने मुंबईत सध्या खळबळ माजली आहे. संबंधित पत्रात अश्लील भाषेचा वापर करत महापौरांना(mumbai mayor) शिवीगाळही झाली आहे.महत्वाचं म्हणजे या सर्व प्रकरणाला राजकीय रंग देखील असल्याचं दिसतंय. त्यातच आता शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली असून, कोरोनाकाळात काम करणाऱ्या महापौरांना अशा पद्धतीचं पत्र येणं दुर्देवी असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

एखाद्या गोष्टीला राजकारणात विरोध असू शकतो पण महिलेला अश्या रितीनं टार्गेट करणं चूकीचं असून, आमच्या रणरागिणीचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांना अशा भाषेत पत्र आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, किशोरी पेडणेकर या डेअर डेव्हील असून अशा पत्रांना भीक घालत नाहीत. ज्या रितीनं संस्कृतीहीन वागणं-बोलणं सुरुय ते पहाता, सत्ता आली नसल्याने रोज उठून आरोप केले जात आहेत असंही त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com