Mhada
Esakal
मुंबई : कोन-पनवेल येथील गिरणी कामगारांच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील १,०८६ विजेत्यांनी अद्याप घरांचा ताबा घेतला नाही. या विजेत्यांनी २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत कागदपत्रांसह संपर्क साधावा, अन्यथा त्यांची सदनिका रद्द करून प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाईल, असा अल्टिमेटम म्हाडाच्या मुंबई मंडळाने दिला आहे.