

Mithi River
ESakal
विष्णू सोनवणे
मुंबई : मिठी नदीच्या महापुरानंतर २००५ पासून आतापर्यंत सुमारे ४,००० कोटी रुपये मिठी नदीवर खर्च झाले आहेत. या पैशात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी एखादा पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण झाला असता. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करूही मिठीचे भय अद्यापही संपलेले नाही. त्यामुळे मुंबईकरांना पैशाचा अपव्यय होत असल्याबद्दल चिंता वाटत आहे.