ACB Trap Pen : दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात; लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले; प्रशांत जगदाळे विरोधात पेण पोलिसांत गुन्हा दाखल

Raigad Bribery Case : रायगड जिल्ह्यातील पेण येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत दुय्यम निबंधक प्रशांत जगदाळे यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पेण पोलिसांत गुन्हा दाखल.
Raigad Bribery Case

Raigad Bribery Case

esakal

Updated on: 

Maharashtra ACB News : शासकीय कार्यालयातील काम करून देण्यासाठी नागरिकांकडे लाचेची मागणी केल्याचा आणखी एक प्रकार रायगड जिल्ह्यातील पेण येथे उघडकीस आला आहे. निवासी करारनामा करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. प्रशांत आबाजी जगदाळे असे या अधिकाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे पेणमधील शासकीय कार्यालयात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...