Sachin Waze: मर्सिडीज, बीएमडब्ल्यू अन् 'ओबेरॉय'मध्ये मुक्काम; सचिन वाझेच्या उत्पन्नावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

Sachin Waze Case: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या उत्पन्नावर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on: 

मुंबई : बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्या कशा आल्या आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये तब्बल १०० दिवसांचा मुक्काम कसा शक्य झाला, असा सवाल करून उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ८) त्याच्या उत्पन्नावर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, शहर पोलिस आयुक्तालयातही तो या महागड्या गाड्यांतूनच जात होता, याबाबत न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com