ST bus
sakal
ठाणे - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या ठाणेकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे - गणपतीपुळे एसटी बससेवा ठराविक मार्गाने सुरू करण्यात आली असून, या मार्गाचा थेट लाभ सुमारे १४ गावांतील ग्रामस्थ आणि प्रवाशांना होणार आहे. त्याचबरोबर दादर - सावंतवाडी कोकण रेल्वेला आवश्यक त्या छोट्या स्थानकांवर थांबा देण्याची मागणीही पुढे आली असून, याबाबत दोन दिवसांत होणाऱ्या कोकण रेल्वेच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. आमदार संजय केळकर यांनी या दोन्ही मागण्यांसाठी पाठपुरावा केला आहे.