

Water Supply from tanker
ESakal
ठाणे : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पाऊस झाल्यामुळे ठाणेकरांना पाणीटंचाईचा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, अपुरा जलसाठा आणि वाढती मागणी यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. ऑक्टोबरपासूनच शहरात दररोज सरासरी ७५ टँकरच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत, त्यापैकी ५५ टँकरसाठी नागरिकांना दररोज ४४ हजार ५०० रुपयांप्रमाणे महिन्याला सुमारे १३ लाख ३५ हजार रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याने ठाणेकर मेटाकुटीस आले आहेत.