शाळांमध्ये मराठी अनिवार्य

शाळांमध्ये मराठी अनिवार्य
Published on

मुंबई, ता. ७ : राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकवणे अनिवार्य आहे. मात्र, कायदा असूनही केंद्रीय मंडळाच्या काही शाळांमध्ये अजूनही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे चालढकल करणाऱ्या अशा शाळांवर थेट कारवाईचे संकेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले.
केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य आहे. यातून त्यांना कोणतीही पळवाट काढता येणार नाही. याबरोबरच मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे, असे भुसे यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंत्रीपदाचे सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा संस्थाचालक संघटना यांच्याशी भेटून त्यांचे प्रश्न समजून घेण्यात आले. शालेय शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा, यासाठीचे सर्वंकष धोरण आणले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असून येत्या आठ दिवसात या धोरणाचा रोड मॅप समोर आणला जाईल. शालेय शिक्षण विकासाची एक दशसूत्री कार्यक्रम जाहीर करून तो राबवला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी राज्यात मराठी भाषा महत्त्वाची आहे. आता या भाषेला केंद्राकडून अभिजात ही दर्जा मिळाला आहे. इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक असतानाही शाळा यातून पळवाट काढताना दिसत आहेत. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचा कायदा करण्यात आला आहे. यामुळे खासगी, सीबीएससी, आयसीएससी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू आहे, त्याअनुषंगाने मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे. आता मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर आता शालेय शिक्षण विभागाची नजर राहणार आहे. याबाबत टाळाटाळ करणाऱ्या शाळांची तक्रार पालकांना करता येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
--
भरमसाठ शुल्क रोखण्यासाठी प्रयत्न
खासगी शाळांमध्ये ज्या पालकांकडून भरमसाठ शुल्क शाळा आकारतात, अशा शाळांना शुल्क नियमकांच्या नियमात आणले जाईल, यासाठी असलेल्या शुल्क नियमक आणि त्याची कार्यपद्धती, कामकाज, सध्याची स्थिती समजून घेऊन राज्यातील प्रत्येक पालक आणि संस्थाचालकांनाही दिलासा मिळेल, अशा प्रकारचे प्रयत्न केले जातील. शुल्काच्या माध्यमातून पालकांची आर्थिक लूट होणार नाही, याकडेही लक्ष दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com