

नागरिकांच्या विनंतीनंतरही
घोणस सापाला जेसीबीने मारले!
वापरा संस्थेकडून घटनेचा निषेध; कठोर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : सापाला वाचविण्यासाठी नागरिकांनी सर्पमित्रांना बोलावण्याची तयारी दर्शवूनही जेसीबीच्या सहाय्याने घोणस जातीच्या सापाला मारण्यात आल्याची घटना आणिक आगार परिसरातील एल अँड टी बांधकामस्थळी घडली. या घटनेचा वन्यजीव संरक्षण आणि बचावासाठी कार्यरत असलेल्या वाइल्डलाइफ ॲनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू असोसिएशन (वापरा) संस्थेने निषेध केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी आणिक आगार येथील बस डेपो परिसरातील एल अँड टी बांधकामस्थळी साप आढळल्याची माहिती वापरा संस्थेला दूरध्वनीद्वारे मिळाली, मात्र सर्पमित्र घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच जेसीबीच्या बकेटने सापाला मारण्यात आले होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी संबंधित जेसीबीचालकाला साप मारू नका, सर्पमित्रांना बोलावतो, अशी विनंती केली होती. तरीही सापाला मारण्यात आल्याचा आरोप संस्थेने केला आहे. घटनेची माहिती परिसराचे राउंड ऑफिसर पंकज घनदारी, तसेच ठाणे वन विभागाच्या मुंबई रेंज नियंत्रण कक्षाला देण्यात आली.
या प्रकरणाची वन विभागाने सखोल चौकशी करून संबंधित जेसीबी चालकाची जबाबदारी निश्चित करावी आणि लागू कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी वापरा संस्थेचे अतुल कांबळे यांनी केली आहे. साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही संस्थेने केले आहे.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.