

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) : पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोराईला निघालेल्या तरुणाची दुचाकी घसरून अपघात घडला. या दुर्घटनेत त्यांच्या दोन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना भाईंदरजवळील राई गाव येथे रविवारी (ता. २६) घडली. या अपघातात मुलाचे आई व वडीलही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भाईंदर पश्चिम येथे राहणारे कुशल शहा यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह दुचाकीवरून गोराईला चालले होते. गोराई गावाच्या पुढे रस्त्यावर पडलेल्या पाण्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. त्यामुळे सर्व जण रस्त्यावर पडले. त्यात त्यांच्या दोन वर्षीय दक्ष याचा मृत्यू झाला. कुशल शहा व त्यांची पत्नी जिनिशा हेदेखील जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाईंदर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.