जेवणावरून मित्रावरच कुऱ्हाडीचे घाव घालणाऱ्या मित्राला अटक

जेवणावरून मित्रावरच कुऱ्हाडीचे घाव घालणाऱ्या मित्राला अटक
Published on

जेवणावरून मित्रावरच कुऱ्हाडीचे घाव घालणाऱ्या मित्राला अटक
भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून खटके उडून वादाचे रूपांतर तुफान राड्यात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच भिवंडीत मंडप डेकोरेशनचे काम करणाऱ्या तीन मित्रांपैकी दोन मित्रांमध्ये जेवणाच्या कारणावरून भांडण होऊन या रागातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोनगाव येथील एका गोदामात घडली. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात मित्रावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. सलीम अन्वर खान (३७) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे; तर भरत शामबाबू राजलोहार (२२) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंदकुमार मुन्ना वर्मा यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. आरोपी सलीम व जखमी भरत हे दोघे त्यांच्यासोबत मंडपाचे काम करत होते. दरम्यान १९ मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हे तिघेही कोनगाव परिसरातील म्हात्रे गाव मैदानातील इंग्रजी माध्यमिक विद्यालयाजवळील अनिल कुमार यांच्या गोदामात मंडप डेकोरेशनचे काम करण्यासाठी गेले होते. त्या वेळी सलीम आणि भरत यांच्यात जेवणावरून वाद होऊन या वादाचे रूपांतर राड्यात झाल्याने सलीमने याच रागातून भरतवर कुऱ्हाडीने वार करून त्यास गंभीर जखमी केले आहे. जखमीवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गोविंदकुमार वर्मा याच्या फिर्यादीवरून सलीमवर याच्याविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com