

मुंबई व्यापारी असोसिएशनच्या शहर संघटकपदी दीपक जाधव यांची नियुक्ती
मुंबई, ता. २५ : गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगावच्या व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध नाव असणारे ‘श्वेता स्टुडिओ’चे संचालक दीपक सूर्यकांत जाधव यांची ‘मुंबई व्यापारी असोसिएशन’च्या शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासह स्थानिक भूमिपुत्रांना स्वयंरोजगारात प्राधान्य देण्यासंदर्भातील दुहेरी जबाबदारी जाधव यांच्यावर असणार आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, दीपक जाधव यांना सोमवारी (ता. २३) मुंबई पत्रकार भवनात असोसिएशनचे अध्यक्ष अनिल फोंडेकर, महिला अध्यक्षा प्रज्ञा मोहिते यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले. जाधव यांची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी दांडगी आहे. ते लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पडवणे जाधव हितवर्धक मंडळाचे सचिव, तसेच मुंबई काँग्रेस (आय) प्रदेश कमिटीचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या याच प्रदीर्घ सार्वजनिक अनुभवाची दखल घेत असोसिएशनने त्यांची या पदावर वर्णी लावली आहे.
------
भूमिपुत्रांना प्राधान्य देणार
मुंबई व्यापारी असोसिएशनच्या ध्येय-धोरणांनुसार स्वयंरोजगार वाढवणे, स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसायात पुढाकार घेण्यासाठी प्रवृत्त करणे आणि व्यापाऱ्यांचे विविध उपक्रम आणि आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे, ही प्रमुख उद्दिष्टे जाधव यांच्या कार्यकाळात असतील. सुरुवातीला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, पुढील कार्य अहवाल पाहून या पदाची मुदत वाढवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.