भिवंडी महानगरपालिकेची विक्रमी १०३.३१ कोटीची मालमत्ता कर वसुली...

भिवंडी महानगरपालिकेची विक्रमी १०३.३१ कोटीची मालमत्ता कर वसुली...
Published on

भिवंडी महापालिकेची विक्रमी करवसुली
१०३.३१ कोटींची तिजोरीत भर; मागील तीन वर्षांतील उच्चांक

भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : नेहमीच थकबाकीमुळे चर्चेत राहणाऱ्या भिवंडी महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ता करवसुलीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे पालिकेने यंदा १०३ कोटी ३१ लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली ठरली आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ मध्ये ९१.३७ कोटी, २०२३-२४ मध्ये ७९.१५ कोटी, तर २०२४-२५ मध्ये ८७.५४ कोटी रुपयांची वसुली झाली होती; मात्र, २०२५-२६ या आर्थिक वर्षात हा आकडा १०३.३१ कोटींवर पोहोचला असून, मागील वर्षीच्या तुलनेत १५.८० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही विक्रमी वसुली साध्य करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली होती. या वर्षात कर विभागाने थकबाकीदारांच्या १३०० मालमत्तांना जप्तीची नोटीस बजावली, तर ५१४२ नळजोडण्या खंडित केल्या. या धडक कारवाईमुळे वसुलीच्या रकमेत मोठी भर पडली आहे. या यशाबद्दल आयुक्त अनमोल सागर आणि महापौर नारायण चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे, उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर, सहायक आयुक्त नितीन पाटील, विभागप्रमुख सुधीर गुरव आणि सर्व कर्मचारीवर्गाचे अभिनंदन केले आहे. नागरिकांनी आपला कर वेळेवर भरून शहराच्या विकासात योगदान द्यावे, जेणेकरून थकबाकी शून्यावर आणता येईल, असे आवाहन महापौर नारायण चौधरी यांनी या वेळी केले.

जीआयएस सर्वेक्षणाचा फायदा
महापालिकेतर्फे सध्या मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण सुरू असून, आतापर्यंत १२,९३५ मालमत्तांचे काम पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणामुळे कर जाळ्यात वाढ होऊन भविष्यात उत्पन्नात अधिक वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com