

सीएनजी पंपावर सुरक्षेचा बोजवारा; मोठ्या अपघाताची भीती
बोईसर, ता. ६ (वार्ताहर) : बोईसरशेजारील पास्थळ येथील गुजरात गॅस कंपनीच्या सीएनजी फिलिंग स्टेशनवर सुरक्षाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याने संभाव्य मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान, वाहनांमध्ये सीएनजी भरण्याच्या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांकडे सेफ्टी हेल्मेट, सुरक्षात्मक बूट यासारखी आवश्यक साधने नसल्याचे आढळले. विशेष म्हणजे, ज्वलनशील वायू हाताळताना मोबाईल फोनचा उघडपणे वापर केला जात असल्याचेही निदर्शनास आले. तज्ज्ञांच्या मते, सीएनजी हा अत्यंत ज्वलनशील व दाबाखाली साठवला जाणारा वायू असल्याने फिलिंग प्रक्रियेदरम्यान काटेकोर नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत निष्काळजी मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकते.
दरम्यान, संबंधित पंपावरील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.