

अडीच वर्षांनंतर शिवसेनेचा महापौर : एकनाथ शिंदे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः महापौर रितू तावडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील सव्वा वर्षे शिवसेनेचा महापौर असेल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने पालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये अस्वस्थता निर्णाण झाली असून शिंदे यांच्या दाव्यानंतर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
एकनाथ शिंदे म्हणाले, की ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याविषयी आधीच चर्चा झाली आहे. महापौर रितू तावडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील सव्वा वर्षे शिवसेनेचा महापौर असेल.’ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी अनौपचारिक बैठकीत पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी शिंदे यांनी मुंबईतील विविध प्रश्नांवर चर्चा केली. दरम्यान, शिंदे यांच्या दाव्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे यांच्या या दाव्यानंतर भाजपकडून कोणतेही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे पालिका वर्तुळात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील रस्त्यांच्या कामांमुळे शहरातील खड्ड्यांची समस्या दूर झाल्याचा दावाही त्यांनी केला. येत्या वर्षभरात मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त होईल, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.