‘क्रॉस कंट्री’त ‘महात्मा फुले’ला सुवर्ण चॅम्पियनशिप

‘क्रॉस कंट्री’त ‘महात्मा फुले’ला सुवर्ण चॅम्पियनशिप
Published on: 

नवीन पनवेल, ता. ५ (बातमीदार) : पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाने कळंबोली येथील केएलई महाविद्यालयात २ ऑक्टोबरला घेतलेल्या मुंबई झोन क्र. १च्या क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत मुलींच्या सुवर्णपदक विजेत्या संघाने महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसी कामगिरी करीत स्पर्धेची सुवर्ण चॅम्पियनशिप मिळविली. या संघामध्ये शिवकन्या ताटे, करीना पवार, आंचल शेळके, दिया कोळी या विद्यार्थिनींचा सहभाग होता.

महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने रौप्यपदक चॅम्पियनशिप मिळवीत महाविद्यालयाचा दबदबा कायम राखला. या संघामध्ये राज भगत, साहिल साळुंखे, विभव घरत, सत्यम ठाकूर आणि तन्मय सावंत या विद्यार्थ्यांचा समावेश होता. साहिल साळुंखे याने मुलांच्या गटात रौप्यपदक प्राप्त केले. महाविद्यालयाच्या या पदक विजेत्या खेळाडूंपैकी शिवकन्या ताटे, साहिल साळुंखे आणि राज भगत या तीन विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाच्या विभागीय संघात निवड झाली.

या यशाबद्दल प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, जिमखाना कमिटीचे चेअरमन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, उपप्राचार्य डॉ. सोनू लांडे, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण गवळी, उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ. सोपान गोवे, ग्रंथपाल सुनील अवचिते, प्रा. प्रवीण गायकर, एनसीसी प्रमुख प्रा. रामदास जमनुके व डॉ. यशवंत उलवेकर व जिमखाना कमिटीतील डॉ. लीना मेश्राम, डॉ. रूपश्री कडू यांच्यासह इतर प्राध्यापकांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.

नवीन पनवेल : महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुले, मुलींच्या संघाने सुवर्ण तसेच राैप्यपदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com