रेल्वे स्थानकातील शौचालय वापर शुल्कात भेदभाव?

रेल्वे स्थानकातील शौचालय वापर शुल्कात भेदभाव?
Published on: 

रेल्वे स्थानकातील शौचालय वापर शुल्कात भेदभाव?
‘आपली मुंबई’चा रेल्वे प्रशासनाला सवाल; दादर स्थानकातील शौचालयात लघुशंकेसाठी एक रुपया शुल्क
धारावी, ता. ८ (बातमीदार) : मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील शौचालयांच्या वापरासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शुल्क आकारले जात असल्याचा आरोप ‘आपली मुंबई’ संघटनेने केला आहे. काही स्थानकांवर लघुशंकेसाठी शुल्क आकारले जाते, तर काही ठिकाणी ही सुविधा मोफत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या या धोरणाबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा धावतात. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांमध्ये तसेच परिसरात शौचालये आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, मात्र या सुविधांसाठी स्थानकनिहाय शुल्क आकारले जात असल्याचा मुद्दा ‘आपली मुंबई’ने उपस्थित केला आहे.
दादर स्थानकातील मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या मुख्य पुलावरील तिकीटघराशेजारी असलेल्या शौचालयात लघुशंकेसाठी प्रवाशांकडून एक रुपया घेतला जात असल्याचे संघटनेने सांगितले. हे शौचालय ‘निधी कॉर्पोरेशन’ला चालविण्यास देण्यात आले आहे. शौचालयाबाहेर कंपनीचा संपर्क क्रमांक लावण्यात आला आहे, मात्र हा क्रमांक अर्धवट असल्याने प्रवाशांना संबंधित कंपनीशी संपर्क साधता येत नसल्याचा आरोप पासी यांनी केला. शौचालयाबाहेर असलेला कर्मचारी प्रवाशांशी उद्धटपणे बोलत असल्याची तक्रारही संघटनेने केली आहे. या प्रकाराविरोधात संघटनेतर्फे पुढील कायदेशीर पावले उचलण्यात येणार असल्याचे पासी यांनी सांगितले.

एकाच रेल्वेची वेगवेगळी धोरणे का?
‘भारतीय रेल्वे एकच असताना मुंबईतील काही स्थानकांवर शौचालयाच्या वापरासाठी शुल्क का आकारले जाते आणि अनेक स्थानकांवर ही सुविधा मोफत का दिली जाते, असा सवाल संघटनेचे निमंत्रक ओमप्रकाश पासी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com