

नवी मुंबई विमानतळावरून
नऊ नवीन देशांतर्गत सेवा सुरू
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या देशांतर्गत नेटवर्कचा विस्तार केला आहे. यात नऊ नवीन गंतव्य स्थानांसाठी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. गोव्यातील मोपामार्गे अगात्ती, दरभंगा, गुवाहाटी, जळगाव, जोधपूर, रांची, बागडोगरा, सिंधुदुर्ग आणि उदयपूर या शहरांचा यात समावेश आहे. नवीन हवाई मार्गांमुळे प्रादेशिक संपर्क यंत्रणा अधिक मजबूत होण्यासोबतच पर्यटन आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांना या नवीन मार्गांमुळे देशातील बेट, किनारपट्टी, वारसा, वन्यजीव, सांस्कृतिक आणि इको-टुरिझमच्या महत्त्वाच्या ठिकाणांशी थेट जोडले जाणे शक्य होणार आहे.‘‘एनएमआयएचे विस्तारणारे देशांतर्गत नेटवर्क आणि वाढती प्रवासी व कार्गो वाहतूक मुंबई महानगर क्षेत्र व आसपासच्या परिसरासाठी कार्यक्षम कनेक्टिव्हिटी देण्याच्या कटिबद्धतेची पावती आहे. हे नवीन मार्ग महत्त्वाच्या प्रादेशिक बाजारपेठांपर्यंत पोहोच सुधारतील आणि पर्यटन, व्यापार व आर्थिक विकासाला पाठबळ देतील’’ असे या विस्ताराबाबत बोलताना एनएमआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून एनएमआयएने २७,१८५ अनुसूचित विमान फेऱ्यांची नोंद केली. यामध्ये २७,१११ देशांतर्गत आणि ७४ आंतरराष्ट्रीय फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच, विमानतळावरून एकूण ३५,८८,६७५ प्रवाशांची वाहतूक झाली असून, यात ३५,८०,२३३ देशांतर्गत तर ८,४४२ आंतरराष्ट्रीय प्रवासी होते. या कालावधीत १,८०१,३७७ प्रस्थान आणि १७,८७,२९८ आगमन नोंदी झाल्या आहेत. तसेच विमानतळाने ४९३ कार्गो उड्डाणे आणि ९६१ जनरल एव्हिएशन फेऱ्या हाताळल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.