

Reviving Heritage: Workshop on Ancient Indian Traditional Games at Vasai Fort
esakal
विरार : भारताची प्राचीन खेळपरंपरा ही हजारो वर्षांची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे. या खेळांमधून मनोरंजनाबरोबरच बुद्धिमत्ता, रणनीती, एकाग्रता आणि सामाजिक संवाद यांचा विकास होत असे. भारतीय संस्कृतीतील अनेक खेळ आजही लोकपरंपरेत जिवंत असून त्यांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. अश्याच काही खेळाची कार्यशाळा येत्या रविवारी वसई किल्ल्यात भरणार आहे. यावेळी शराव्यूह, नवकंकारी, अष्टचामा, चक्रव्यूह आणि वाघबकरी याखालचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन वसई किल्ले मोहीमचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत हे करणार आहेत.