turmeric loss by rain
sakal
नांदेड - मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला असून, पहिल्या दिवशी जवळपास २०० पेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे वाऱ्यामुळे नुकसान झाले. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने ३०० हेक्टर याप्रमाणे एकूण ५०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर रात्रभर शहरातील अर्ध्या भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.