Nanded News : जिल्ह्यात १२ मंडळात अतिवृष्टी; सरासरी ३६ मिलीमीटरची नोंद

अवकाळी पावसाने जिल्ह्याला सोमवारी (ता. २७) पहाटे झोडपून काढले. तब्बल अडीच महिन्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १२ मंडळात अतिवृष्टी झाली.
Nanded Rain
Nanded RainSakal
Updated on

नांदेड - अवकाळी पावसाने जिल्ह्याला सोमवारी (ता. २७) पहाटे झोडपून काढले. तब्बल अडीच महिन्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १२ मंडळात अतिवृष्टी झाली. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३६.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील तीन, चार दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान विभागानेही पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, सोमवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस देगलूर आणि मुखेड तालुका वगळता इतरत्र झाला. यामुळे जिल्ह्यातील तब्बल १२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू, ज्वारी या पिकासह खरिपातील कापूस आणि तुर पिकाचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे.

नांदेड शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. लालवाडी, हिंगोली गेट येथील रेल्वे अंडर ब्रिजखाली पावसाचे पाणी साचल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. देगलूर नाका तसेच गोकुळनगर, आनंदनगर, वसंतनगर आदी सखल भागातील काही नगरांमध्ये पावसाचे पाणी साचले होते.

अतिवृष्टी झालेले मंडळे (मिलीमीटरमध्ये)

नांदेड तालुक्यात नांदेड शहर (६८ मिलीमीटर), लिंबगाव (९९), तरोडा (८२.३०), नाळेश्वर (७०.८०), अर्धापूर तालुक्यात अर्धापूर (७७. ५०), दाभड (६९), कंधार तालुक्यात उस्माननगर (७६.३०), लोहा तालुक्यात सोनखेड (७६.३०), कलंबर (७६.३०), शेवडी (७४), हदगाव तालुक्यात तामसा (६५.३०) आणि पिंपरखेड (६५.३०).

तालुकानिहाय सरासरी पाऊस (मिलीमीटरमध्ये)

नांदेड - ६१.५०, बिलोली - ९.१०, मुखेड - ४.४०, कंधार - ४२.९०, लोहा - ६३.४०, हदगाव - ५४.२०, भोकर - ५३.१०, देगलूर - शुन्य, किनवट - ३२, मुदखेड - ५३.६०, हिमायतनगर - ४८.५०, माहूर - ३१.६०, धर्माबाद - २१.७०, उमरी - ४४, धर्माबाद - ६७.३०, नायगाव - ३०.१०.

चार जनावरे दगावली

सोमवारी पहाटे अवकाळी पावसामुळे जिल्ह्यामध्ये चार जनावरे दगावली असून, त्यात पिंपरी (ता. किनवट) येथील संजय रघुनाथ गुट्टे यांची एक म्हैस, रहाटी बुद्रुक (ता. नांदेड) येथील रामा ब्रम्हाजी खरवे यांचा एक बैल आणि खुजडा (ता. मुदखेड) येथील तानाजी जयवंत पवार यांच्या दोन शेळ्यांचा समावेश आहे. तसेच एका कच्च्या घराचे नुकसान झाले आहे.

ऊस आडवा तर कापूस मातीमोल

बेमोसमी पावसाचा तडाखा

नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

खरीपातील तुरीला फायदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com