

Sangli Crime News Police Controversy
esakal
Maharashtra Police Crime News : ज्या पोलिसांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्याच पोलिसांच्या हातून एखाद्याचा जीव जात असेल तर सामान्य माणसाने न्याय मागायचा तरी कुणाकडे? पोलिसच कायद्याचे भक्षक बनू लागले तर समाजाच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? सांगलीत दिवाळीच्या दिवशी घडलेल्या एका खळबळजनक घटनेने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. विशेष म्हणजे, या घटनेत दोन पोलिस कर्मचारीच; ते सुद्धा सख्खे भाऊ खुनाच्या आरोपाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे हा केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूचा प्रश्न राहिलेला नाही, तर पोलिस दलाच्या विश्वासार्हतेची कसोटी ठरला आहे.
- शेखर जोशी