धरणीमातेला जणू साड्यांचा आहेर

धरणीमातेला जणू साड्यांचा आहेर
Published on

4572
रोपलावणीचा तयारी ः मॉन्सूनपूर्व पावसामुळे यंदा खरीप हंगाम पुढे गेला. सध्या पाऊस थांबल्याने रोप लावणीला भाताची रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी तरवा टाकला आहे. तरव्यातील भाताचे दाणे पक्षी खातात म्हणून चाफोडी (ता. राधानगरी) येथे तरव्यावर पांघरलेल्या रंगीबेरंगी साड्या. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)
...............
धरणीमातेला जणू साड्यांचा आहेर

संरक्षणासाठी तरव्यांवर पांघरल्या रंगीबेरंगी साड्या

सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. १ ः सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भात रोपलावणीसाठी तरवे टाकले आहेत. तरव्यातील भाताचे दाणे मोर, कावळे, कोंबड्या आदी पक्षी खातात. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध रंगांच्या साड्या त्यावर पांघरल्या असून, जणू त्यांनी धरणीमातेला साड्यांचा आहेरच केल्याचा भास होतो आहे. शिवारात ठिकाठिकाणी असे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवून दिली. हातातोंडाशी आलेली उन्हाळी पिके वाया गेली, तर खरीप हंगामाचे नियोजन बिघडले आहे. दहा-बारा दिवस पाऊस राहिल्याने भाताची धूळवाफ पेरणी-टोकणणी थांबली आहे. पेरणीसाठी तयार ठेवलेल्या रानांची पुन्हा मशागत करण्याची वेळ आली आहे. ज्या ठिकाणी पाणी साठत नव्हते त्याही ठिकाणी पाणी साचून राहिले आणि आता सगळीकडेच चिखल करून भाताची रोप लावण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतरऱ्यांची पुन्हा तारांबळ उडाली आहे.
तयार केलेल्या रानातच आता शेतकऱ्यांनी भात रोपलावणीसाठी रोपे तयार करण्यासाठी तरवा टाकला आहे. भाताचे बियाणे पशुपक्षी खातात. त्यामुळे त्यांच्याकडून नुकसान होऊ नये यासाठी तरव्यांवर साड्या पांघरल्या असून, हे पाहिल्यानंतर शेतकऱ्यांनी जणू धरतीमातेला साड्यांचा आहेरच केल्याचा भास होतो आहे. गावोगावी शिवारात सध्या असे चित्र पाहायला मिळत आहे. पुन्हा पावसाने सुरुवात केल्यावर जुलै महिन्यात सर्वच ठिकाणी भात रोपलावणीची धांदल उडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com