हक्काच्या गोष्टीसाठी संघटीत व्हा

हक्काच्या गोष्टीसाठी संघटीत व्हा
Published on

04454
कबनूर : येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस दाभाडकर यांचा सत्कार करताना अवधूत साठे व ग्रामपंचायत कर्मचारी.
-----------
हक्काच्या गोष्टीसाठी संघटीत व्हा
गिरीश दाभाडकर : कबनूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. २१ : हक्काची कोणतीही गोष्ट सरळ मिळत नाही तर संघर्ष हा करावाच लागतो. त्यासाठी संघटित होणे ही काळाची गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांनी कबनूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘राज्यामध्ये जवळपास २७ हजार ग्रामपंचायतींमध्ये ६० हजारांच्या आसपास कर्मचारी काम करीत आहेत. मात्र, त्यांना कायद्याप्रमाणे योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने त्यांच्यासाठी आपणास संघर्ष करावा लागतो.’ यावेळी झालेल्या चर्चेत विनायक इंगवले, शंकर कांबळे, आण्णाप्पा वडर, सूरज शिंगे, योगेश कांबळे, महेश पाटील, जयश्री घाटगे, स्वाती निंबाळकर यांनी भाग घेऊन समस्या मांडल्या. कबनूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे कामगार युनियनचे प्रमुख अवधूत साठे यांच्या हस्ते गिरीश दाभाडकर यांचा सत्कार केला. संतोष शिंदे (जि. हिंगोली), दिगंबर सोनटक्के (जि. वाशिम), राजेश ठाकरे (जि. यवतमाळ) यांचा सत्कार केला. पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, पापालाल सनदी, सुधीर पाटील, प्रकाश विटकर, सहिदा डबीर, तक्षशिला चव्हाण, स्वाती निंबाळकर, अमित भरमगोंड आदी उपस्थित होते. लक्ष्मण वाघमारे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com