

08963
कचरा टाकणाऱ्यांना १० जणांना
मोरेवाडी ग्रामपंचायतीतर्फे दंड
कंदलगाव, ता. १७ : मुख्य रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आज मोरेवाडी ग्रामपंचायतीतर्फे कंदलगाव ते आर. के. नगर मुख्य रस्त्यावर मोरवाडीचे सरपंच ए. व्ही. कांबळे, उपसरपंच संजय वास्कर व सदस्यांनी कारवाईची धडक मोहीम राबवली. मोहिमेत कंदलगाव, पाचगाव, जवाहरनगरसह परिसरातील हॉटेल व इतर व्यावसायिक अशा १० जणांवर कारवाई केली.
परिसरात कचरा डेपो आहे.पण तो रस्त्यापासून शंभर फूट आत आहे.या ठिकाणी कचरा टाकण्यास कोणतीही मनाई नाही. परंतु येता-जाता नागरिक दुचाकीवरूनच रस्त्याच्या कडेला कचरा टाकून प्रसार होतात. त्यातून दुर्गंधी येताच रोषाला मोरेवाडी ग्रामपंचायतीला सामोरे जावे लागते. वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकत नसल्याने आज मोरेवाडीचे सरपंच ए. व्ही. कांबळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आक्रमकता दाखवत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. कचरा टाकणाऱ्यावर कारवाई सुरू असतानाच मोरेवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील टपरीधारक, खाऊ गल्ली, हॉटेल्स, मटण, चिकन विक्रेत्यांसह व्यावसायिकांना कचरा घंटागाडीतच टाकण्याची सूचना करत जनजागृती केली.
कोट.
कचऱ्याबाबत होणाऱ्या कारवाईबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. मोरेवाडी ग्रामपंचायतीने अशीच कारवाई भविष्यातही सुरू ठेवावी.
- प्रकाश निर्मळ, कंदलगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.