कोडोलीत नृसिंह जयंती उत्साहात साजरी

कोडोलीत नृसिंह जयंती उत्साहात साजरी
Published on

03230
नृसिंह जयंतीनिमित्त
कोडोलीत पालखी सोहळा
ंकोडोली ता. २१ : येथील नृसिंह जयंती सेवा मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांनी नृसिंह जयंती झाली. यावेळी शिबिरात ७५ दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी आयोजित महाप्रसादाचा हजारो लोकांनी लाभ घेतला.
सकाळी नऊला पोपट शंकर कापरे यांच्या घरातून श्रींचा मूर्ती व पालखी सोहळा झाला. धनगरी ढोलांच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी श्रींच्या मूर्तीचे दर्शन लोकांनी घेतले. जयंतीनिमित्त अर्पण ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सकाळी काकड आरती, दिवसभर मंदिरामध्ये भजन, कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी सुयेश कापरे, संभाजी कापरे राजेंद्र कापरे, संदीप भोसले यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. गजानन कापरे व शंकर कापरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती बांधली. जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई केली होती. जन्मोत्सवानंतर फटाक्यांची आतषबाजी झाली. रात्री महाप्रसादाचे वाटप वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे यांच्याहस्ते झाले. महाप्रसादाचा परिसरातील हजारो लोकांनी लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com