कोडोलीतील गावडे कुटुंबाला शिवम प्रतिष्ठानकडून मायेचं घर

कोडोलीतील गावडे कुटुंबाला शिवम प्रतिष्ठानकडून मायेचं घर
Published on

03848
कोडोली (ता. पन्हाळा) ः येथे शिवम प्रतिष्ठानतर्फे आक्काताई गावडे यांना बांधून दिलेल्या ऋणानुबंध मायेच्या घरात गृह प्रवेशप्रसंगी इंद्रजित देशमुख, के. द. पाटील, शिवाजीराव मोरे आदी.
..............................
कोडोलीतील गावडे कुटुंबाला
शिवम प्रतिष्ठानकडून मायेचं घर
कोडोली, ता. २९ : भारत देशात आजही लाखो गरिबांना हक्काचा निवारा नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या कुटुंबाला हक्काचा निवारा देण्यासाठी शिवम प्रतिष्ठानच्या साधकांनी सुरू केलेल्या ऋणानुबंध मायेचं घरं या उपक्रमाला समाजातील दानशूर व्यक्तींनी सहाय्य करावे, असे आवाहन निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी केले.
कोडोली (ता. पन्हाळा) येथे आक्काताई गावडे कुटुंबाला ‘ऋणानुबंध मायेचं घर’ अर्पण करून गृहप्रवेश केला. यावेळी देशमुख बोलत होते. शिवम परिवार कोल्हापूर विभागात पन्हाळा, कोडोली, वारणा, सातवे परिसरातील साधकांनी कोडोली (ता. पन्हाळा) येथील आक्काताई गावडे यांचे ऋणानुबंध मायेचं घर तीन महिन्यांत पूर्ण केले आहे. यासाठी मदत करणाऱ्यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार केला. राहुल पाटील, अक्षय डोंबे, शिवराज जाधव शिवम साधकांचे ऋण गावडे परिवाराने व्यक्त केले. वारणा दूध संघाचे संचालक शिवाजीराव मोरे, गोकुळ दूध पुरवठा संस्था कर्मचारी संस्थेचे संस्थापक के. द. पाटील-कौलवकर, समाधान पाटील, सुहास माने, विरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. कोडोली येथील शिवम साधक अनिकेत केकरे यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com