करंबळी उपसरपंच निवड वादाच्या भोवऱ्यात

करंबळी उपसरपंच निवड वादाच्या भोवऱ्यात
Published on

gad282.jpg :
47875
संगीता गवस
--------------------------
करंबळी उपसरपंच निवड वादाच्या भोवऱ्यात
संगीता गवस यांची वर्णी : राजीनामा न देताच निवड प्रक्रियेची तक्रार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता गवस यांची बिनविरोध निवड झाली. आपण राजीनामा न देताच उपसरपंच निवडीची प्रक्रिया राबवल्याची तक्रार राजाराम इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे करंबळीची उपसरपंच निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीसाठी आज विशेष सभा झाली. सरपंच अनुप पाटील अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच पदासाठी संगीता गवस यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तेजस्विनी पाटील त्यांना सूचक आहेत. सभेला लक्ष्मण पन्हाळकर, मोहन मोटे, दयानंद भोईटे, शांताबाई माळी, सोनाली गिलबिले, माया कांबळे, सुधाकर पाटील, बबन कदम, एकनाथ गवस, अक्षय मिसाळ, रवींद्र यादव आदी उपस्थित होते. ग्रामसेविका रेश्मा पोवार यांनी आभार मानले.
करंबळी ग्रामपंचायतीची उपसरपंच निवड बेकायदेशीर असल्याची तक्रार राजाराम इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. उपसरपंचपदाचा राजीनामा न देता खोटी सही करुन उपरपंच निवड केली आहे. याबाबत माझी तक्रारही ऐकून घेतली नाही. दोन दिवस आधी कोणताही अजेंडा न लिहिता सभेसाठी माझी सही घेतली होती. अजेंड्याबाबत विचारले असता नेहमीप्रमाणे मासिक सभा असल्याचे सांगितले. शिवाय नवीन उपसरपंच निवडीची कोणतीही नोटीस मला दिलेली नाही. त्यामुळे उपसरपंच निवड बेकायदेशीर आहे. माझी खोटी सही करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी. तसेच योग्य शासकीय प्रक्रिया न पाळल्याबद्दल व खोट्या सहीची शहानिशा न करणे, अर्जदाराचे म्हणणे न ऐकल्याबद्दल ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
-------------
राजीनामा दिल्यानंतर राजाराम इंगळे यांनी तीनवेळा नोटीसवर सही केली आहे. यातील एका सभेला ते उपस्थितही होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा न देता उपसरपंच निवड केल्याचा आरोप चुकीचा आहे. इंगळे यांनी राजकीय द्वेषातून हा आरोप केला आहे.
-अनुप पाटील, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com