इचल : जलपर्णीचे भूत

इचल : जलपर्णीचे भूत
Published on

47945
इचलकरंजी ः रुई बंधारा परिसरात पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी आली आहे. ही जलपर्णी पुढील काळात इचलकरंजीतील नदीपात्रात येण्याची भिती आहे.
...
रुई बंधाऱ्याजवळ आतापासूनच जलपर्णी

काही दिवसांत जलपर्णी इचलकरंजी बंधाऱ्याजवळ येण्याची शक्यता

इचलकरंजी, ता.२८ ः पंचगंगा नदीपात्रात रुई (ता. हातकणंगले) येथील बंधाऱ्याजवळ आतापासूनच जलपर्णी आली आहे. पुढील काही दिवसांत ही जलपर्णी वाहत इचलकरंजी बंधाऱ्याजवळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इचलकरंजीचे पात्रही जलपर्णीने व्यापल्याचे दिसणार आहे. त्याचे प्रत्येकवेळी उत्तरदायित्व इचलकरंजी महापालिकेवर येवून पडते. त्यामुळे या जलपर्णीची इचलकरंजी महापालिका प्रशासनाने धास्ती घेतली आहे. त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
पंचगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह थांबल्यानंतर पात्रात मैलायुक्त सांडपाणी, विविध उद्योगातील रसायनयुक्त सांडपाणी अनेक ठिकाणी मिसळते. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दुषित होवून जलपर्णी वाढीस लागते. काही कालावधीनंतर जलचर मृत होतात. गेल्या अनेक वर्षांत हे विदारक चित्र पहावसाय मिळत आहे. त्याचा बहुतांशी ठपका हा इचलकरंजी महापालिकेवर ठेवला जातो. इचलकरंजीतील नदीपात्रही जलपर्णीने व्यापले जाते. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचे अस्तित्वच नाहीसे होते. दरवर्षी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कर्मचारी, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलपर्णी काढली जाते. पण जलपर्णीचा वेग मोठा असतो. त्यामुळे कितीही जलपर्णी काढली तरी ती संपत नाही, वाढतच राहते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती पुढे जाते.
गेल्या वर्षीही पंचगंगा नदीपात्र जलपर्णीने व्यापले होते. त्यावेळी तणनाशकांचा वापर करुन जलपर्णी नष्ट करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. त्याला पर्यावरणवादी व्यक्ती व संस्थांनी जोरदार आक्षेप घेतला होता. शासनाच्या विविध पातळीवर तक्रारीही झाल्या होत्या. त्यामुळे अर्ध्यावरच ही मोहिम थांबविण्यात आली होती. यावेळी मात्र महापालिका प्रशासन आतापासूनच दक्ष झाले आहे. रुई येथे बंधाऱ्यात जलपर्णी आली आहे. ही जलपर्णी पुढे वाढत व वाहत इचलकरंजी नदीपात्रात येण्याची शक्यता अधिक आहे.
...
जलपर्णी काढण्याची जबाबदारी कोणाची?
यावेळी धरणातील पाण्याची परिस्थिती पाहता पंचगंगा नदी उन्हाळात सतत प्रवाहित राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जलपर्णीचे भूत यंदाही शासकीय- निमशासकीय संस्थांच्या मानगुटीवर बसणार आहे. पुढील काळात प्रदुषणाची तीव्रता वाढल्यास पुन्हा जलपर्णीने पंचगंगा नदीपात्र व्यापणार आहे. त्यामुळे पाणी पिण्यास अयोग्य होणार आहे. त्यामुळे जलपर्णी रोखण्याची अथवा ती काढण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. यामध्ये महापालिका - जलसंपदा विभाग यांच्यात संघर्षाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com