दुष्काळग्रस्त सवलती तात्काळ अंमलात आणा ः जिल्हाधिकारी

दुष्काळग्रस्त सवलती तात्काळ अंमलात आणा ः जिल्हाधिकारी
Published on

दुष्काळग्रस्त तालुक्यातील सवलती
तत्काळ अंमलात आणा ःजिल्हाधिकारी
कोल्हापूर, ता. २८ ः राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्या संबंधी सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यामध्ये शासनाने मंजुरी दिलेल्या सवलती लागू करण्यासाठी तत्काळ आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. यामध्ये जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या तालुक्यातील गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती तत्काळ अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com