आंतर जिल्हा सब-ज्युनियर गर्ल्स फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना

आंतर जिल्हा सब-ज्युनियर गर्ल्स फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना
Published on

68919
कोल्हापूर ः जळगाव येथे होणाऱ्या आंतर जिल्हा सब-ज्युनियर गर्ल्स फुटबॉल स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघासोबत मधुरिमाराजे छत्रपती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
.....

आंतर जिल्हा सब-ज्युनियर गर्ल्स
फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित राज्य आंतर जिल्हा सब-ज्युनियर गर्ल्स फुटबॉल स्पर्धेसाठी के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा मुलींचा फुटबॉल संघ आज जळगावला रवाना झाला.
तत्पूर्वी छत्रपती शाहू स्टेडियम येथे ११ दिवसांचे सराव शिबिर आयोजित झाले. यातून निवडलेल्या संघात सिद्धी हवालदार, जान्हवी पाटील, आर्या माळी, सई साळोखे, अमरीन शेख, प्रीती पाटील, नेहा गिरीगोसावी, सई नलवडे, भार्गवी भोसले, समीक्षा चौगले, धनश्री पाटील, युगंधरा पाटील, सई बोंडगे, आर्या कांबळे, देवयानी पाटील, लावण्या चव्हाण, श्रद्धा पाटील, स्वरा मगदूम यांचा समावेश आहे. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमित शिंत्रे, सहायक प्रशिक्षक म्हणून सानिका चौगले यांची नियुक्ती करण्यात आली. संघाला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे छत्रपती, के.एस.ए.चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्या मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com