आजरा ः वेळवट्टीत गव्याकडून काजू पिकाचे नुकसान

आजरा ः वेळवट्टीत गव्याकडून काजू पिकाचे नुकसान

80542
वेळवट्टी (ता. आजरा) : येथे गव्यांच्या कळपाने उद्‍ध्वस्त केलेली काजूची झाडे.
...
वेळवट्टीत गव्यांकडून
काजू झाडे उद्‍ध्वस्त
आजरा, ता. २९ : वेळवट्टी (ता. आजरा) येथे गव्यांच्या कळपाकडून काजूची दोन झाडे उद्‍ध्वस्त करण्यात आली. यामध्‍ये डॉ. धनाजी गोविंद राणे यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतात अनेकदा गव्यांच्या कळपाने धुडगूस घातला आहे.
डॉ. राणे यांची ‘हुंबराचे पाणी’ येथे शेती आहे. या शेतीमध्ये काजू, आंबे, चिक्कू, मेसकाठीचे पीक आहे. येथे दोन दिवसांपासून गव्याचा कळप धुडगूस घालत आहे. कळपाने शेतातील काजूचे उत्पादन देणारी दोन झाडे उद्‍ध्वस्त केली आहेत. यापूर्वीही गवे व डुकरांनी शेतातील भुईमूग, ऊस, नारळ, काजू, चिक्कू, आंबा, कोकम, केळी, मेसकाठी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गव्याच्या कळपाचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com