इचल ः सत्यजीत पाटील भेट

इचल ः सत्यजीत पाटील भेट

82831
...
इचलकरंजी ः महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील - सरुडकर यांनी काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
...
इचलकरंजीकरांनी दिलेली साथ विसरणार नाही
सत्यजित पाटील ः आभार दौऱ्यात कार्यकर्त्यांशी साधला संवाद

इचलकरंजी, ता. १० ः ‘माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला दिलेली साथ आणि एकजुटीने राबविलेली प्रचार यंत्रणा याबद्दल मी इचलकरंजीकरांचे आभार मानतो. तुमचे हे उपकार मी कदापी विसरू शकणार नाही’, अशा भावना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी व्यक्त केल्या. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सत्यजित पाटील-सरुडकर विविध गावांना भेटी देऊन प्रचार यंत्रणेत कार्यरत असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानत आहेत. त्याच अनुषंगाने शुक्रवारी ते इचलकरंजीत आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘प्रशासकीय यंत्रणा, निवडणूक आयोग आपल्याविरोधात होता. निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत पैशांचा बेसुमार वापर करण्यात आला. माझ्यासोबत असणाऱ्यां‍ना धमक्यांचे फोन येत होते. तरीदेखील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी माझी साथ सोडली नाही, याचा प्रत्यय मला इचलकरंजीत आला. या उपकाराची परतफेड निश्‍चितपणे केली जाईल.’
यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रांतिक सदस्य मदन कारंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, बादशहा बागवान, सदा मलाबादे, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, प्रताप होगाडे, महेश बोहरा, राहुल खंजिरे, शिवाजी साळुंखे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com